परिवर्तन: उन्नत मानवतेकडे झेप
प्रस्थापित व्यवस्थेचा इतका जबरदस्त पगडा समाजातील सर्वांवर—सामान्य जनांवर आणि त्यांच्या नेत्यांवर— असतो की ही सर्व मंडळी प्रस्थापित रीती व मूल्यांप्रमाणे वागत असताना, त्यातील दोष व चुका त्यांना दिसत असूनही, तो रुळलेला मार्ग सोडायला तयार होत नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेमध्ये माणसे इतकी गुंतून राहण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे की त्या व्यवस्थेने मान्य केलेल्या सुख-कल्पना, त्या कल्पनांतील सुखप्राप्तीची …